मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य विकास योजना

मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य विकास योजनेचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात रोजगाराची आणि प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करुन देणे हा योजनेचा हेतू आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम मोफत असून याअंतर्गत दहावी-बारावीच्या पर्यंत शिक्षण घेतलेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.

तसंच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असल्याचंही त्यांनी यावेळी सागितलं. दरम्यान, ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमा अंतर्गत कोरोनामध्ये आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रात 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यात 20 हजार प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे