
लसीकरण धोरण बदलल्यानंतर आता केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसचे जास्तीत जास्त दर निश्चित केले आहेत. सरकारने या लसींचे सुधारीत दर जाहीर केले आहेत, त्यानुसार कोव्हिशिल्ड आता खाजगी लसीकरण केंद्रांमध्ये 780 रुपये तर कोवॅक्सीन 1410 रुपयात उपलब्ध होणार आहेत. त्याच वेळी, स्पुतनिकची किंमत 1145 केली गेली आहे.












