SSC Result: आज दहावीचा निकाल

राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल आज 16 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने लागणार आहे. यंदाची एकूण विद्यार्थी संख्या 16 लाख 58 हजार 624 इतकी आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020-21 या शैक्षणिक वर्षाची दहावीच्या परीक्षा रद्द करून, सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे सरसकट उत्तीर्ण करण्याबाबत परवानगी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने दिली आहे.

  • विद्यार्थ्यांचे 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन – 30 गुण
  • विद्यार्थ्यांचे 10 वीचे गृहपाठ/तोंडी परीक्षा/प्रात्याक्षिक परीक्षा यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन – 20 गुण
  • विद्यार्थ्याचा 9 वीचा विषयनिहाय अंतिम निकाल – 50 गुण

ज्या विद्यार्थ्यांना वरील पद्धतीने तयार केलेला निकाल समाधानकारक वाटत नसेल, त्यांना कोव्हिड-19 ची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील दोन परीक्षांमध्ये परीक्षेची संधी देण्यात येईल.

विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यांची निकाल समिती असेल.

या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केली जाईल. शाळास्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली होती.

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी 100 गुणांचं मूल्यमापन करण्यात येईल. नववी आणि दहावीचे शाळाअंतर्गत मूल्यमापन करण्यात येईल. 

या संकेतस्थळावर तुम्हाला तुमचा निकाल पाहाता येणार आहे.

या वेबसाईटवर दुपारी १:००वा पाहू शकाल SSC 2021 निकाल.

www.results.mkcl.org
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com