Mumbai Rain Update: मुसळधार पाऊस आणि पाणीच पाणी, शहरात विक्रोळी, चेंबूर आणि भांडूप येथे दरड व संरक्षक भिंत कोसळली

रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा पूर्णपणे बंद

मुंबई शहरात रात्रभर संततधार पाऊस कोसळतो आहे. या पावसामुळे , मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली. अनेक ठिकाण सकल भागात पाणी साचले. मुसळधार पावसामुळे शितल, कल्पना कुर्ला डेपो, अंजनाबाई मगर, कपाडिया नगर, जरीमरी येथे पाणी साचले असून कुर्ला येथील बस सेवा स्थगित करण्यात आली आहे.

मुंबईतील (Mumbai) चेंबूर (Chembur) भागामध्ये जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने (Wall Collapse) यात 11 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. चेंबूरच्या भारतनगर भागात हा अपघात  घडला आहे. घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल (NDRF) आणि पोलिस(Mumbai Police) पथक घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.  रविवारी पहाटेच्या सुमारास  विक्रोळी (Vikhroli) भागात एक  रहिवासी इमारत कोसळली आहे. आणि यात जण ठार जण ठार झाल्याची बातमी बीएंमसीने  दिली आहे.

विक्रोळी इथे पावसामुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीनजणांचा मृत्यू झाला आहे तर दोनजण जखमी झाले आहेत. विक्रोळी मधल्या सूर्या नगर, पंचशीळ चाळ भागात ही दुर्घटना घडली आहे. जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री पावणेतीनच्या सुमारास सतत पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरक्ष: झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रुळांवर पाणी साचल्याने लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

पुढील 24 तासांसाठी मुंबईत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाच्या बरोबरीने गडगडणे आणि वेगवान वाऱ्यांचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सखल भागात पाणी भरण्याची शक्यता आहे. भरतीच्या वेळी काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसामुळे रस्ते वाहतुकीला फटका बसण्याची शक्यता आहे.