

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सन्माननीय अध्यक्ष योगेशजी अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वसई विरार जिल्हयाचे जिल्हाप्रमुख मा.राजनजी नाईक यांच्या सहकार्याने, ओबीसी मोर्चाचे सन्माननीय महासचिव श्री संजयजी गाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार, दिनांक १७.७.२०२१ वसई विरार शहराच्या संघटनात्मक दौऱ्यानिमित्त वसई विरार शहर ओबीसी मोर्चाची बैठक, वसई विरार जिल्हा अध्यक्ष राजनजी नाईक यांच्या जिल्हा कार्यालय, नालासोपारा येथे पार पडली.

या बैठकीस आवर्जुन जिल्हा अध्यक्ष राजनजी नाईक उपस्थित होते. बैठकीमध्ये महासचिव संजयजी गाते सरांनी जिल्ह्याचा संघटनात्माक आढावा घेतला व पुढील ओ. बी. सी. मोर्चा कामकाजासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच या बैठकीमध्ये मनसे चे विभाग अध्यक्ष श्री देवेन्द्र चोरगे यांनी भाजपा ओबीसी मोर्चा मध्ये प्रवेश केला.

बैठकीस उपस्थित प्रदेश पदाधिकारी, ओबीसी मोर्चा महाराष्ट्र महिला संपर्क प्रमुख श्रीमती वनिता लोंढे, उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र भोईर, , वसई विरार प्रभारी व कार्यकारीणी सदस्या सौ लताताई पगारे, केदारनाथ म्हाञे कार्यकारीणी सदस्य ,जिल्हा सरचिटणीस निलेश राणे, गणेश पाटील, अमृत मानकर

सुहास पांचाळ- नालासोपारा अध्यक्ष,सुनील मासाये- विरार अध्यक्ष,अनिल राऊत – वसई शहर अध्यक्ष व ओ. बी. सी. मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.






