
कोविड-19 विरुद्ध दिली जाणारी लस ही स्तनदा मातेच्या दुधामध्ये आढळून येत नाही, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे गर्भवती आणि स्तनदा मातांनी लस घेतल्यास ती लस त्यांच्या बाळापर्यंत पोहचत नाही, हे सिद्ध होते. हा अभ्यास युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्को च्या संशोधकांकडून करण्यात आला आहे. एमआरएनए व्हॅसिन, फायझर आणि मॉडर्ना लसी घेतलेल्या 7 वेगवेगळ्या महिलांचे दूध या अभ्यासासाठी तपासण्यात आले होते. त्यापैकी कोणत्याही महिलेच्या दुधामध्ये लसीचा स्ट्रेस आढळला नाही.
बाळाला दूध पाजताना जरी लस घेतली तरी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे JAMA Pediatrics मध्ये दिलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. यामुळे स्तनदा मातेवर लसीचा परिणाम होतो, असा समज असलेल्यांसाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने स्तनदा मातांना लस घेण्यास सांगितले आहे. तर अॅकेडमी ऑफ ब्रेस्टफिडिंग मेडिसिननुसार लस घेतलेल्या मातांच्या ब्रेस्ट टीश्यूमध्ये लसीचे नॅनो पॅरटीक्लस जावून नवजात शिशूच्या रोगप्रतिकारक शक्तीला धोका निर्माण होऊ शकतो.
या अभ्यासामुळे एमआरएनए लस स्तनदा मातांसाठी अतिशय सुखरुप असून स्तनदा मातांनी ही लस जरुर घ्यावी आणि लस घेतल्यानंतर ब्रेस्टफिडिंग थांबवू नये, असे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रान्सिस्कोचे असिस्टंट प्रोफेसर Stephanie L. Gaw यांनी सांगितले.











