
कोलंबो (Colombo) येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाने मालिकेत दणदणीत पुनरागमन करत शिखर धवनच्या भारतीय संघाला (Indian Team) पराभवाचा दणका दिला आहे.
टीम इंडियाने (Team Idnia) दिलेल्या 133 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात लंकन संघाने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून लक्ष्य सध्या केले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. लंकन संघासाठी सलामी फलंदाज मिनोद भानुकाने 36 धावा काढल्या. संघाच्या विजयात धनंजय डी सिल्वाने (Dhananjay de Silva) नाबाद 40 धावांची कामगिरी बजावली तर चमिका करुणारत्ने 12 धावा करून नाबाद परतला.
दुसरीकडे, टीम इंडियासाठी कुलदीप यादवने सर्वाधिक 2 विकेट्स काढल्या. तसेच भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती व राहुल चाहर यांनी प्रत्येकी एक विकेट काढली.











