India vs Sri Lanka T20: शेवटच्या सामन्यात भारताचा दारूण पराभव, श्रीलंकेने T20 मालिका 2-1 ने जिंकली

यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेच्या तिसऱ्या व अंतिम सामन्यात टीम इंडियाला (Team India) लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. आहे.

टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत धवन ब्रिगेडने 8 विकेट्स गमावून माफक 81 धावाच केल्या. प्रत्युत्तरात लंकन संघाने 3 विकेट्स गमावून लक्ष्य गाठले व सामन्यासह मालिकाही खिशात घातली. 

2019 नंतर दासून शनकाच्या (Dasun Shanaka) नेतृत्वात यमन संघाचा हा पहिला मालिका विजय ठरलं आहे. भारतापूर्वी  इंग्लंड दौऱ्यावर श्रीलंका टीम (Sri Lanka Cricket Team) एकही सामना जिंकू शकली नाही. इतकंच नाही तर भारताविरुद्ध टी-20 मालिकेत श्रीलंकेचा हा पहिला विजय ठरला आहे.

यापूर्वी टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय टी-20 मालिका कधीही गमावली नव्हती पण धवन ब्रिगेडही विजयी मालिका मोडीत काढली आहे.

कर्णधार धवन पाठोपाठ काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा आघाडीच्या व मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. परिणामी संघ आव्हानात्मक धावसंख्या उभी करू शकला नाही.

 भारताने दिलेल्या माफक 82 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात यजमानास संघाने तीन विकेट्स गमावल्या पण अखेर विजयासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताचा पराभव करून  पहिलीवहिली टी-20 मालिका आपल्या नावावर केली.