मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील कॅटरिंग आणि डेकोरेटर्स व्यावसायिकांची राज ठाकरेंशी भेट, कॅटरिंग क्षेत्रांतील व्यवसाय समस्यांवर लक्ष घालण्याची मागणी

नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन च्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे कोरोना काळात बंद पडत असलेला केेटरिंग व्यायवसाय पुन्हा कसा चालू होऊ शकतो यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी तसेेेच यात लक्ष घालावे म्हणून भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.


राज ठाकरे याांनी मागण्या रस्ता स्वरूपातील आहेत आणि या संदर्भात मी स्वतः जातीने उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांशी बोलून घेतो व तुम्हाला लवकरात लवकर न्याय कसा देता येईल हे पाहतो असं आश्वासन दिलेलं आहे.


या भेेटी वेेळी मुंबई ते नवी मुंबई व ठाणे ते पालघर आणि दादर ते विरार या ठिकाणाहून सर्वच केटरर्स, डेकोरेटर्स आणि इव्हेंट्स क्षेत्रातील व्यावसायिक तथा पदाधिकारी उपस्थित होते.