HSC RESULTS: उद्या दुपारी 4 वाजता जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाच्या 12 वी चा निकाल

शासन निर्णयाप्रमाणे मूल्यमापन कार्यपध्दती तसेच मंडळाच्या सूचनांनुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, इयत्ता 12 वी परीक्षा सन 2021 चा निकाल मंडळामार्फत तयार करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत 2021 मध्ये उच्च माध्यमिक 12 परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार, अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक 3 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 4 वाजता वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे-

https://hscresult.11thadmission.org.in

https://msbshse.co.in

hscresult.mkcl.org

mahresult.nic.in.

https://lokmat.news18.com

www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.