हॉटेल, रेस्तराँ, मॉल्स रात्री १० पर्यन्त सुरू ठेवण्यास परवानगी

मुंबई /  १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असेल. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, राज्यातील हॉटेल व्यावसियकांसाठी दिलासादायक निर्णय देखील घेतला गेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

त्यानुसार आता १५ ऑगस्टपासून राज्यभरातील हॉटेल, रेस्तराँ, मॉल्सलाही रात्री १० वाजपेर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्यांन्याच मॉलमध्ये प्रवेश असणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तर, धार्मिकस्थळ व सिनेमागृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत.


आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, आरोग्य विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे जो प्रस्ताव गेला होता. त्यामध्ये निर्बंध कमी करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्यानुसार १५ ऑगस्टपासून मोठ्या पद्धतीने ज्या शिथिलता दिलेल्या आहेत, त्या संदर्भात जो आता निर्णय झालेला आहे, त्याबाबत मी सांगतो आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, लोकल ट्रेन्सबाबत आता डबल डोस आणि दुसऱ्या डोस नंतरचे १४ दिवस झालेले असणे आवश्यक आहे. अशा व्यक्तिंना प्रवास करण्यास परवानगी असणार आहे.