परिवहन मंत्री, शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीची नोटीस

महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) नोटीस बजावली आहे. तसेच त्यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी ईडी कार्यलयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय (Sanjay Raut) यांनी माहिती दिली आहे. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमागे अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यासंदर्भातील अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हारयल झाली होती. त्यानंतर भाजपने अनिल परब यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ”शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र’.”