बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता सलमान खान मन्नत येथील किंग खानच्या घरी पोहोचला आहे. सलमान शाहरुखच्या घरी पोहोचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सलमान खान हा शाहरुख आणि कुटुंबाशी आर्यनबद्दल बोलण्यासाठी आला आहे.

NCB ने मुंबईजवळील ‘Cordelia the Impress’ क्रूझवर छापा टाकला, त्या पार्टीत जवळपास 600 लोक उपस्थित होते. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात 3 मुलींचा समावेश आहे.