IPL 2021, RCB vs KKR Eliminator: विराट सेना पराभूत, KKR ची RCB वर चार विकेटने मात

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर (Royal Challengers Bangalore) 4 विकेटने दणकेबाज विजय मिळवून आयपीएल जेतेपदाची दिशेने आगेकूच सुरूच ठेवली आहे.

आरसीबीला  (RCB) पहिले फलंदाजी करून 138 धावांपर्यंतच मजल मारता आली. प्रत्युत्तरात केकेआरसाठी  (KKR) बॉलनंतर बॅटने सुनील नारायणने (Sunil Narine) जबरा खेळ करून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. नारायणने पहिले चार विकेट घेतल्या. तर बॅटने 15 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. तसेच शुभमन गिलने 29 आणि व्यंकटेश अय्यरने 26 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, केकेआरविरुद्ध पराभवासह कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्सचा यंदाच्या आयपीएलमधून पॅकअप झाला आहे. आरसीबीसाठी मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, शारजाहच्या मैदानात झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात विजेता केकेआर संघ आता दिल्ली कॅपिटल्ससोबत अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी दुसरा क्वालिफायर सामना खेळेल तर पराभूत झालेला आरसीबी संघ थेट स्पर्धेबाहेर पडला आहे. यासह एकही आयपीएल ट्रॉफी न जिंकता विराट कोहलीच्या आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून प्रवास संपुष्टात आला आहे. विराटने स्पर्धेपूर्वीच पुढील वर्षांपूर्वी आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता.

आरसीबीचा (RCB) कर्णधार विराट कोहलीने  (Virat Kohli) सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध महत्त्वपूर्ण एलिमिनेटर सामन्यात 39 धावांचे मोठे योगदान दिले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या कोहलीने आयपीएल 2021 मध्ये सातत्यपूर्ण खेळ केला आहे. श्रीकर भरत आणि सलामीवीर देवदत्त पडिक्कल लवकर बाद झाल्यावर त्याने केकेआर (KKR) गोलंदाजांचा संयमाने सामना केला. अपवादात्मक खेळीमुळे तो ऑरेंज कॅप टेबलमधील 11 व्या स्थानावर पोहोचला आहे. आयपीएल 2021 मध्ये कोहली 400 पेक्षा अधिक धावांचा पल्ला गाठला आहे. विराटने यंदा तीन अर्धशतकासह 11 सामन्यात एकूण 405 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर रुतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलला  (KL Rahul) मागे टाकण्याची संधी आहे ज्याने एलिट यादीत 626 धावा फटकावल्या आहेत. रुतुराज एकूण 15 सामन्यात 603. धावा करून यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब कर्णधार राहुलकडे पर्पल कॅप असली तरी संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे आता रुतुराजकडे आयपीएल फायनल सामन्यात मोठी संधी आहे.