श्रीलंका बॉम्ब स्फ़ोटाने हादरली ; ईस्टर संडे ठरला ब्लॅक संडे दोनशेहून अधिक जण ठार , जवळपास पाचशे जख़मी

गुड फ्रायडे नंतर येणारा ईस्टर संडे ब्लॅक संडे ठरला. या दिवशी तीन चर्च व तीन पंचतारांकीत हॉटेलमध्ये झालेलया आठ बॉम्ब स्फ़ोटाने श्रीलंका हादरली. श्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि परिसरात सकाळी नऊच्या सुमारास दहशतवाध्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फ़ोटामंध्ये सुमारे सव्वादोनशे नागरिक ठार,तर सुमारे पाचशेहुन अधिक जण जख़मी झाले आहेत. सकाळी सुरु झालेले बॉम्बस्फ़ोटाचे हे सत्र दुपारच्या दोन वाजण्याच्या सुमारास थांबले, एकामागून एक असे एकूण आठ स्फ़ोट झाले. ठार आणि जख़मी झालेल्या नागरीकांमध्ये परदेशी नागरिक व भारतीयांचाही समावेश आहे. या बॉम्बस्फ़ोटामागे नॅशनल तौहीत जमात (एन टी जे) या दहशतवादी संघटनेचा हात असलयाचे बोलले जात आहे. आंतरराष्ट्रिय दहशतवादी संघटनेचा कनेक्शन असलयाचा दाट संशय असून श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे तसेच समाजमाध्यमांवर निर्बंध घालण्यात आले आहे.