
मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (Medical Counselling Committee, MCC) ने विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे. विद्यार्थ्यांना कमिटीने बनावट एजंटसंबंधी सावध केले आहे. नीट 2021 निकालाच्या घोषणेनंतर आता लवकरच देशभर वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी काऊन्सेलिंग प्रक्रिया सुरू होईल. परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी या प्रक्रियेत सामील व्हायचे आहे, त्यांना त्यांच्या रँकनुसार, मेडिकल कॉलेज आणि कोर्स मिळेल. याच दरम्यान एमसीसी म्हणजेच मेडिकल काऊन्सेलिंग कमिटीने (Medical Counselling Committee, MCC) ने या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एक महत्त्वाची अॅडव्हायजरी जारी केली आहे
एमसीसीने उमेदवारांना हेदेखील सूचित केले आहे की एमसीसीची अधिकृत वेबसाइट https://mcc.nic.in/#/home व्यतिरिक्त कोणत्याही अन्य वेबसाइट द्वारे कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने कोणत्याही बनावट संकेतस्थळांपासून सावध व्हा.






