पुण्याला परत पावसाचा जोरदार तडका; राज ठाकरे यांची पहिली प्रचार सभा रद्द

पुणे: पुण्यात सायंकाळी सहा वाजल्यापासून शहर आणि परिसरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, ग्राहक पेठेजवळ पुणे परिवहन सेवेच्या बसवर झाड कोसळल्याने या दुर्घटनेत चालकाला जीव गमवावा लागला.

विधानसभा निवडणुकीत उतरलेल्या मनसेची आज पहिली सभा होणार होती. गेल्या काही दिवसांपासून मनसेला सभेसाठी मैदान मिळत नव्हते. आता मात्र मैदान मिळाले परंतु, पावसाने तडाखा दिल्याने मनसेला ही सभा रद्द करावी लागली आहे.