मुंबई: शिवसेनेचे विक्रोळीतील उपविभागप्रमुख शेखर जाधव यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे विक्रोळीत मोठी खळबळ उडाली आहे. या गोळीबारात शेखर जाधव गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर गोदरेज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्राथमिक माहितीनुसार, विक्रोळीच्या टागोरनगर परिसरात हा प्रकार घडला.
चंद्रशेखर जाधव त्यांच्या मुलासह साईनाथ मंदिरात असलेल्या कार्यालयात बसले होते. त्याच वेळी अभय...
मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधाची धार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतेय. आज देशभरात आंदोलन सुरुय. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलनं झाली. मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं. राजकीय पक्ष, तरुण आणि बॉलिवूड सेलिब्रेटींचाही सरकारविरोधात हल्लाबोल पहायला मिळाला. नागपुरात मुस्लिम बांधवांनी विधिमंडळावर मोर्चा काढला. राज्यात कायदा लागू होऊ देणार नाही असं आश्वासन...
विशाखापट्टणम : दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीमने वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवला आहे. भारताने ठेवलेल्या ३८८ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा २८० रनवर ऑलआऊट झाला आहे. कुलदीप यादवची हॅट्रिक आणि इतर भारतीय बॉलरच्या चोख कामगिरीमुळे भारताला सहज विजय मिळवता आला. भारताकडून कुलदीप आणि मोहम्मद शमीला प्रत्येकी ३-३ विकेट मिळाल्या. तर रवींद्र जडेजाला २ आणि शार्दुल ठाकूरला १ विकेट मिळाली.
विशाखापट्टणम : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये कुलदीप यादवने विक्रमाला गवसणी घातली आहे. कुलदीप यादवने हॅट्रिक घेऊन भारताचा विजय आणखी सोपा केला आहे. वनडे क्रिकेटमधली कुलदीप यादवची ही दुसरी हॅट्रिक आहे. भारताकडून वनडेमध्ये २ हॅट्रिक घेणारा कुलदीप हा एकमेव खेळाडू आहे. याआधी कुलदीपने २०१७ साली कोलकात्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.
भारताकडून सगळ्यात पहिले हॅट्रिक घेण्याचा...
सातारा: पुणे-बेंगळुरू महामार्गावर साताऱ्याजवळ आणेवाडी टोलनाका आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडून इथं टोलवसुली केली जाते. मात्र, टोलच्या बदल्यात वाहनधारकांना कोणत्याही सुविधा दिल्या जात नाहीत. संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे. महामार्गावर शौचालयांची सोय नाही. अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराच्या सुविधा नाहीत. शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाचं याकडं लक्ष वेधलं होतं. तसंच, महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत...
हैदराबाद : २७ नोव्हेंबर रोजी चौघा नराधमांनी डॉक्टर दिशा हिच्यावर अत्याचार करून तिला जाळून मारलं होतं. या प्रकरणी मोहम्मद आरिफ, जे. नवीन, जे. शिवा आणि चेनाकेशवुलू यांना अटक करण्यात आली होती. चौकशीसाठी घटनास्थळावर नेलेल्या या नराधमांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्याआधी पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली होती....
मुंबई: अनेक भारतीयांना रेसिंग बाईकचं वेड असतं. बाईक पाहताना पहिला प्रश्न असतो बाईक किती सीसीची आहे. भारतीय बाजारात फार तर पाचशे सीसीच्या बाईक्स उपलब्ध आहेत. पण आता ज्यांना वेगाचा थरार अनुभवायचा आहे अशा बाईकप्रेमींसाठी ट्रायम्फची रॉकेट-थ्री नावाची बाईक बाजारात आली आहे. भारतीय बाजारात आता ट्रायम्फ कंपनीची रॉकेट-थ्री नावाची एक सुपरबाईक आली आहे. या बाईकला दोन कारच्या ताकदीएवढं इंजिन...
मुंबई : मोबाईल पोर्ट (MNP)करण्यासाठी आता एक आठवडा थांबण्याची गरज नाही. टेलिकॉम रेग्यलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या नियमांनुसार ही प्रक्रिया पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. आता फक्त तीन दिवसांत ही प्रक्रिया होणार असून 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
MNP च्या नियमांनुसार ग्राहक आपला नंबर बदलल्याशिवाय एका ऑपरेटरकडून दुसऱ्या ऑपरेटरकडे पोर्ट करू शकतो. या सगळ्या बदलाला...
मुंबई: जगभरात इन्स्टंट मेसेजिंग म्हणून लोकप्रिय ऍप मोबाईल युजरना धोकादायक ठरत आहे. WhatsApp मध्ये युजर्सना सातत्याने नवनवे फीचर्स जरी मिळत असले तरी अनेक उणिवादेखील समोर येत आहेत. आता पुन्हा एकदा व्हॉट्स अॅपमध्ये एक धोकादायक ‘बग’ असल्याचं समोर आलं आहे. यामुळे हॅकर्स केवळ एक मेसेज पाठवून अॅप क्रॅश करु शकतात. एकदा अॅप क्रॅश झाल्यानंतर तुम्हाला अॅप अनइंस्टॉल करुन...
पुणे: नटसम्राट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागूयांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमीवरील विवेकवादी नट काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. लागू यांच्या निधनाने...










