राजापूर (कोकण) : भाजपा आणि शिवसेना यांची पुन्हा एकदा जुंपणार असे चिन्हे दिसत आहे. आज महाजनादेश यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाचे जोरदार समर्थन केले तसेच सरकार याबाबत पुनर्विचार करणार असल्याचे संकेत दिले.
या प्रकल्पामुळे १ लाख बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. राजापूर येथे महाजनादेश...
सोलापूर: येथे जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवर सडकून टीका करतानाच कार्यकर्त्यांना उभारी देण्याचं कामही केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच पवार यांनी सोलापूरमधील आठवणींना उजाळा दिला. बऱ्याच दिवसांनंतर मी सोलापूरकरांसमोर बोलायला उभा राहिलो आहे. माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापुरातून झाली. १९६५ साली मी तरुणांचं नेतृत्व केलं. तेव्हा सोलापूरची जबाबदारी माझ्यावर होती, अशी आठवण...
कणकवली (सिंधुदुर्ग) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा आज सिंधुदुर्गात पोहोचली. या यात्रेचं नारायण राणे यांनी स्वागत केलं. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. शिवसेना-भाजपचं काहीही ठरलं तरी मी भाजपमध्ये प्रवेश करणारच, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यात येणार असल्याचं सांगतानाच नितेश राणेसह...
मुंबई: सध्या पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी काही शेतकरी जुन्या कर्जाची परतफेड करुन नवीन कर्जासाठी अर्ज करत आहेत. तर काही जुन्या कर्जाचं पुनर्गठण करुन घेत आहेत. मात्र कर्जाची ही प्रक्रिया अतिशय किचकट असल्याचा शेतकऱ्यांचा समज आहे. पीक कर्ज नेमकं मिळतं तरी कसं?
शेतकऱ्याला सेवा सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकाकडून पीककर्ज मिळतं. यासाठी बँकेचा...
पुणे: येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू असल्याने या पक्षांची युती होणार की नाही, असा प्रश्न सर्वांना पडलेला असताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीवर मात्र शिक्कामोर्तब झाले आहे.
येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडी करणार असून त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही...
धरमशाला : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालकेतील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे.
सामन्यासाठी क्रिकेट रसिक फार उत्सुक होते. मात्र, पावसाने ठाण मांडल्याने प्रेक्षकांचा पुरता हिरमोड झाला आहे. धरमशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. शुक्रवारी दोन्ही संघांना मैदानात सरावही करता आला नाही. त्यात आज दुपारी...
चालू घडामोडी
कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मेडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र तावडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
वैभववाडी : कुंभजाई एज्युकेशन सोसायटी संचलित सोनाळी अभिनव इंग्लिश मेडीयमच्या संस्थापिका स्मिता रवींद्र तावडे वय 55 यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनाळी अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल चे छत्र हरपले आहे. त्यांच्या निधनानंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. कै. स्मिता तावडे यांचे मुळगाव कुंभवडे हे आहे. पती कै....
मुंबई: आज रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सकाळी १०.४८ ते दुपारी ३.५१ दरम्यान मोगाब्लॉक घेण्यात येत आहे. या काळात धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येत आहेत. या कारणामुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत.
हार्बर...
मुंबई: मुंबई, मुंबई उपनगरे, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यात रात्री पासून मुसळधार पाऊस सुरू असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरे, भिवंडी, मीरारोड, भाईंदर, वसईला पावसाने रात्रीपासून झोडपले असून या भागांमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या भागांमधील अनेक रस्त्यांवरही पाणी साचले असून वाहनांना पाण्यातून वाट काढत पुढे जावे लागत आहे.मुंबईत उपनगरांनाही मुसळधार पावसाने रात्रीपासून झोडपले असून पश्चिम उपनगरात अंधेरी,...
कोलंबो: आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी १०६ धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात बांगलादेश सहज विजय मिळवेल, असेच सर्वांना वाटले होते. मात्र, डावखुरा फिरकीपटू अथर्व अंकोलेकरने २८ धावांत टिपलेल्या ५ गड्यांमुळे भारताने जेतेपदावर नाव कोरले. बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर बाद झाला. अकबर अली (२३) व मृत्यूंजय चौधरी (२१) यांचा अपवाद वगळता बांगलादेशचे अन्य फलंदाज...













