आयकर विवरणपत्र (ITR) भरण्यासाठी मुदतवाढ; नवीन तारीख 31 ऑगस्ट पर्यंत

2018-19 या आर्थिक वर्षासाठीचा इन्कम टॅक्स रीटर्न फाइल करण्यासाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, काही करदात्यांना या मुदतीत आयटीआर फाइल करण्यात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. फॉर्म-१६ च्या उपलब्धतेसह विविध कारणांचा यात समावेश असून ही बाब लक्षात घेऊनच आयटीआर फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सीबीडीटीने नमूद केले आहे.

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी आधी निर्धारित करण्यात आलेली ३१ जुलै ही डेडलाइन बदलण्यात आली असून त्यास एका महिन्याची म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आज हा निर्णय घेतला.