
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे.
पक्ष प्रवेशानंतर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, शिवसेना वाढवण्याचं काम मी करणार आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंच्या कामानं मी प्रभावित झाल्याचंही ते म्हणाले आहेत.






