
गेले अनेक दिवस चालू असलेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपाला आज हिंसक वळण लागले. कोर्टाने आदेश दिल्यानंतरही एसटी कर्मचारी आज बेभान झालेले दिसले त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला. शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी हल्लाबोल केला.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारच्या घरावरील हल्ल्याची ताबडतोब दखल घेऊन हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले. आंदोलनाचे खरे सूत्रधार कोण हे शोधून काढण्याकरता एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.






