
जगप्रसिद्ध नायगारा फाॅल्स दर्शन कॅनडाच्या बाजूने
कॅनडाच्या ऑटोरियो मधील नायगारा फाॅल्स हे एक छोटेसे, सुखद शहर नायगारा नदीच्या काठावर असलेला हा नैसर्गिक धबधबा आहे.

नायगारा फाॅल्स मध्ये तीन धबधबे एकत्रित होऊन युनायटेड स्टेट्स मधील न्यूयॉर्क आणि कॅनडातील ऑटोरियाच्या सीमेवर आहे. या तिघापैकी एकास हाॅर्सोई फाॅल्स म्हणून ओळखतात.दुसरे दोन लहान अमेरिकेन फाॅल्स आणि ब्राइडल व्हिल नावाने ओळखले जातात. या धबधब्याचा प्रवाह प्रचंड शक्तीशाली असा आहे.
नायगारा फाॅल्स पहाणे हे अनेकाचे स्वप्न असते आणि ते दोन्ही बाजूने प्रचंड संख्येने जगभरातील पर्यटक येऊन पाहात असतात. या ठिकाणी उंच टाॅवर आहे.हाॅटेल्स,मेमोरियल, वाॅटर पार्क, थिएटर इत्यादी मनोरंजना साठी कल्पकतेने अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत.
ज्या नायगारा नदीने अमेरिका आणि कॅनडा यांच्यातील नैसर्गिक सीमा रेषा तयार केली आहे अशा या नदीचे जवळ जवळ 90% टक्के पाणी घोड्याच्या आकाराच्या नलिके वरून वाहात असते.जगातील सर्वात लोकप्रिय फाॅल्स ठरला असून तो अत्यंत विलोभनीय आहे.रात्रीच्या वेळेस हे धबधबे विविध रंगाने चमकतात ते पाहाणे म्हणजे म्हणजे डोळ्यांना अनोखी मेजवानीच असते.
प्रेमी युगुलांचे हे सर्वाधिक आवडते ठिकाण आहे.याला जगातील हनीमून कॅपिटल असे टोपण नाव पडले आहे.
क्रमश:
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन











