
आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष (७५ वर्षे) देशभरात साजरा होत असताना आज नवी मुंबईत शौर्य दिनानिमित्त नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोशिअशनच्या वतीने अक्षता बँक्वेट्स, भीमा शंकर सोसायटी, नेरुळ या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घर घर तिरंगा या ऐतिहासिक आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्त दात्याला आयोजकांच्या वतीने भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा प्रदान करण्यात आला.
आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाच आपण काहीतरी देणे लागतो हीच भावना लक्षात घेऊन देशाच्या सीमेवर आपणा सर्वांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी, आपल्या रक्ताचे काही थेंब जीवनदान ठरु शकतात या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असे आयोकांकडून सांगण्यात आले.

कार्यक्रमासाठी नवी मुंबई चे माजी खासदार संजीव नाईक, मा. महापौर जयवंत सुतार, मा. सभागृह नेते इथापे आणि मा. विरोधी पक्ष नेते दशरथ भगत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि या सर्वांनीच उपस्थित व्यावसायिक बांधवाना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांची सुरुवात दीप प्रज्वलीत करून करण्यात आली.

या प्रसंगी भीमाशंकर सोसायटी मधील संचालक मंडळातील अध्यक्ष रमेश पवार, संचालक अभिमन्यू पानसरे, रंगारावं पाटील, समाजसेविका पवार ताई, समाजसेवक संजय ठाकूर, मनसे नेते सविनय म्हात्रे, गायकवाड, अभिजीत देसाई, आणि नवी मुंबई वेडींग अँड एव्हेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष प्रकाश ढसाळ, सचिव उमेश दरवेस, उपसचिव दिनेश पाटील, खजिनदार कैलास मुद्रस, सहखजिनदार संतोष भोसले आणि सहकारी सचिन जाधव, नितीन बंदावणे, सचिन दुरगुडे, हरीश शेट्टी, दिलीप रोकडे, अश्विन वर्तक, गिरीश राव, सोनावणे, चौधरी, संतोष सकपाळ, रोहित नटे, सुकेश शेट्टी, रिबीका फोटोग्राफी, लोरन्स, अब्दुल हमीद, खंडागळे आणि भूमिपुत्र लाईट अँड मंडप असोसिएशनचे अध्यक्ष मढवी व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.











