पृथ्वी शॉ आठ महिने आऊट; डोपिंग चाचणीत दोषी

मुंबई: उदयोन्मुख क्रिकेटपटू पृथ्वी शॉला मोठा धक्का बसला आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेलं औषध पृथ्वी शॉला महागात पडलं असून डोपिंग चाचणीत दोषी ठरल्याने पृथ्वीला बीसीसीआयने आठ महिन्यांसाठी निलंबित केलं आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे.

त्याने अनावधानाने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केलं आहे. सामान्यपणे हा पदार्थ कफ सीरपमध्ये आढळतो. हे डोपिंग नियमांचं उल्लंघन असून त्यामुळेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे’, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

१६ मार्च २०१९ ते १५ नोव्हेंबर २०१९ असा निलंबनाचा कालावधी असेल. त्यामुळे बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात होणाऱ्या आगामी मालिकांमध्ये त्याला संधी मिळू शकणार नाही, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.