शिवसेनेची भावोजी (आदेश बांदेकर) मार्फत ‘माऊली संवाद’ यात्रा

मुंबई: शिवसेनेची ‘जन आशीर्वाद’ नंतर भाजपाची ‘महा जनादेश’ यात्रा आणि आता शिवसेनेकडून महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी भावोजी आदेश बांदेकर यांच्यामार्फत ‘माऊली संवाद’ यात्रेची सुरुवात करण्यात आली आहे.

यात्रेचा शुभारंभ पालघर पासून करण्यात आले. पण पहिल्याच दिवशी भावोजीना महिलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागली. महिलांनी पाणी, वीज आणि रस्ते विकास या समस्येवर प्रश्नाचं भडीमार केला. याप्रसंगी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे हे ही उपस्थित होते.