
मुंबई: भारत सध्या आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये आलेली मंदी, वाहन विक्री मधील घट, रिअल इस्टेटमध्ये सुध्दा मंदीची स्थिती तसेच सॉफ्टवेअर, आय टी, बँकिंग इत्यादी क्षेत्रातील चिंताजनक स्थिती, दुष्काळ परिस्थिती. या सगळ्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर झाला आहे तसेच बेरोजगारी वाढण्याची शक्यता आहे. येत्या वर्षभरात फक्त महाराष्ट्र राज्यात जवळपास दहा लाख लोकांवर नोकरी गमविण्याची वेळ येवू शकते. हे सर्व चित्र पाहता देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर असल्याचे आर्थिक जाणकारांचे म्हणणे आहे.






