रशियाचं ‘लुना 25’ लँडर चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं, आता साऱ्या नजरा भरताच्या चांद्रयान 3 वर

भारताचे चांद्रयान 3 मिशन सुरू झाल्यानंतर रशियाने त्याचं लुना मिशन सुरू केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठी जणु भारत आणि रशिया यांची शर्यत सुरू आहे असं म्हटलं जात होतं आणि आज बातमी आली की रशियाच लुना मिशन फेल झाल.

रशियाचं लुना 25 हे लँडर चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हे रॉकेट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या बेतात होतं. मात्र प्री-लँडिग ऑर्बिटमध्ये गेल्यावर त्यात काही समस्या निर्माण झाल्या.

हे रॉकेट चंद्रावर सोमवारी उतरणार होतं. चंद्रावर गोठलेलं पाणी आणि इतर काही गोष्टी धरून ठेवतं का हे पाहण्यासाठी हे मिशन आखण्यात आलं होतं.

रॉसकॉसमॉस ही संस्था रशियाची अंतराळ संशोधन संस्था आहे. लुना 25 चा संपर्क तुटल्याचं या संस्थेने सांगितलं आहे.

रॉकेट एका अनोळखी कक्षेत गेले आणि चंद्रावर कोसळलं.” असं या संस्थेने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं रॉकेट ‘लुना 25’ च्या रुपानं चंद्राच्या दिशेने झेपावलं होतं.

11 ऑगस्ट 2023 च्या पहाटे 2 वाजून 50 मिनिटांनी रॉसकॉसमॉस स्टेट स्पेस कॉर्पोरेशनने ‘लुना 25’ हे अंतराळयान वोस्तोचनी कॉस्मोड्रोम इथून प्रक्षेपित केलं होतं.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी सध्या भारत आणि रशिया यांच्यात स्पर्धा सुरू आहे. भरताच्या चांद्रयान 3 ने आतापर्यंतचे सर्व टप्पे यशस्वीपणे पार पाडले आहेत. काही दिवसापूर्वी फोटो देखील पाठवले होते.

भारताच्या चांद्रयान 3 ने पाठवलेला फोटो

आतापर्यंत कोणताही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवापर्यंत पोहोचलेला नाही. अमेरिका आणि चीन चंद्राच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचले आहेत.

चंद्रावर खरंच पाण्याचा विपुल साठा असेल तर तिथून चंद्रापलीकडच्या अंतराळ मोहिमांसाठी एक बेस तयार करता येईल, पाण्यातल्या हायड्रोजनला इंधनरूपात वापरता येईल, अशी आशा अंतराळ संशोधकांना आहे. त्यामुळे सगळे या दक्षिण ध्रुवाकडे चालले आहेत. अवघ्या काही तासात भारताच चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश हा बहुमान प्राप्त करेल. त्यामुळे जगभरातील साऱ्या नजरा आता भारताच्या चंद्रायान 3 कडे लागल्या आहेत.