
अभिलेखांचा उपयोग वैयक्तिक, सार्वजनिक आणि राष्ट्रीय जीवनात कशा प्रकारे होत असतो
कोणत्याही खाजगी संस्थेत, किंवा शासकीय , निमशासकीय कार्यालयात अभिलेखांची निर्मिती होत असते.आणि हे अभिलेख भविष्यातील उपयोगासाठी जतन करून ठेवावे लागतात. याच कागदपत्रांद्वारेच शासनाचे धोरण, घेतलेले निर्णय, यांचे स्पष्टीकरण करण्यास मदत होत असते. यामध्ये प्रशासनिक उपयोग, वैधानिक गरज, कायदेशीर बाबी, सरकारी वसुली साठी पुरावा, तसेच ऐतिहासिक व चरित्रात्मक संदर्भ साधने म्हणूनही हे अभिलेख जपून ठेवावे लागतात.
आता वैयक्तिक अभिलेखांचे मानवी जीवनात किती महत्व असते ते पाहू. घरात नवशिशू बाळ जन्माला आल्यापासून ते त्याच्या अंतिम श्वासापर्यंत त्यांच्या संदर्भात जे जे अभिलेख निर्माण होतात ते सर्वच दस्तावेज अत्यंत महत्त्वाचे असतात.
जन्मतारीख शाळाप्रवेशासाठी, शैक्षणिक अर्हता काॅलेजकरीता, पुढे नोकरी मिळविण्यासाठी ही प्रमाणपत्रे, प्रापर्टी खरेदी, विवाह, निवृत्ती अशी जीवनातील अनेक विषयांला स्पर्श करणारी असंख्य कागदपत्रे ती आपणांस उपयोगी असल्याने जतन करून ठेवावीच लागतात. यावरून मानवी जीवनात त्यांची किती उपयुक्तता असते हे आपल्या लक्षात येईल.
या पुर्वीच्या लेखातून ऐतिहासिक दस्तावेजाचे किती महत्व असते त्याविषयी अनेक उदाहरणे देऊन अधोरेखित केले आहे.याच कागदपत्रांद्वारेच कितीतरी वादग्रस्त प्रश्नाची शेवटी उकल होण्यास कशी मदत झाली त्याची उजलणी येथे करीत नाही. शेवटी राष्ट्रीय जीवनात काय किंवा संस्था, शासकीय, निमशासकीय, खाजगी , याबरोबर तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आपले हक्क शाबीत करायला ही कागदपत्रेच उपयोगी पडतात. त्याशिवाय तुमच्या नुसत्या मौखीक कथनाला काहीही अर्थ नसतो हे आपल्या ध्यानी येईल. म्हणूनच अभिलेखांचे महत्त्व लक्षात घेऊन ते सुव्यवस्थित पणे जतन करून ठेवले पाहिजेत. हे बंधन नव्हेतर एक प्रामाणिक कर्तव्य म्हणून ते ज्यांचा अभिलेख व्यवस्थापनाशी संबंध येतो त्या सर्वानीच मान्य करायला पाहिजे.अभिलेखागारातील कर्मचारी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आनंदाने निभावून नेतील अशी माझी खात्री आहे
डाॅ.भास्करधाटावकर, निवृत्तपुराभिलेखसंचालक, महाराष्ट्रशासन. मोबाईल 835 595 7451












