चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग, भारत जगातला पहिलाच देश ठरला

चंद्रयान-3ने चंद्राच्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं आहे. असं करणारा भारत जगातला पहिलाच देश ठरला आहे. आतापर्यंत कुणालाही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्यात यश आलेलं नाही.

आतापर्यंत जगातल्या फक्त 4 देशांना चंद्रावर लँडिंग करण्यात आलं आहे. त्यात भारत, रशिया, अमेरिका आणि चीन यांचा समावेश आहे. या क्लबमध्ये भारताचा चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर समावेश झाला आहे.

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, चंद्रयान-2 चं लँडर मॉड्यूल यश मिळेल अशाच पद्धतीने डिझाइन केलं होतं. पण आता त्याच्या अपयशानंतर त्याचं विश्लेषण करून चंद्रयान-3 ची रचना करण्यात आली आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रयान-3 साठी प्रामुख्याने तीन उद्दिष्टं निश्चित करण्यात आली आहेत.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडरचं सॉफ्ट लँडिंग करणं

लँडरमधून रोव्हरला उतरवणं आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून फिरवणं

लँडर आणि रोव्हरच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागाचं अन्वेषण करणं

एलआयबीएस चंद्राच्या पृष्ठभागावर 14 दिवस घालवेल आणि विविध ठिकाणी विश्लेषित केलेली माहिती लँडरला पाठवेल. लँडर ही माहिती इंडियन डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. या माहितीचे विश्लेषण करून इस्रो चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांची माहिती मिळवेल.

रोव्हरवर बसवलेलं दुसरं उपकरण आहे एपीएक्सएस म्हणजेच अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर. हे चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि खडकांमध्ये मुबलक प्रमाणात असलेले रासायनिक संयुगे शोधून काढेल.

रशियाचं लुना 25 हे लँडर चंद्रावर उतरण्याआधीच कोसळलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली  होती त्यामुळे जगभरातून भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेचे कौतुक होत आहे. इस्त्रोला जगभरातून अभिनंदन करणारे संदेश प्राप्त होत आहेत.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी देखील थेट दक्षिण आफ्रिकेतून इस्त्रोच्या टीम चे अभिनंदन केले आहे आणि तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.