
अभिलेखांचे आयुष्य कसे वाढविण्याची, दुरूस्ती करून पुनर्जीवन करण्याची पद्धती
मुंबई पुराभिलेखागारात ईस्ट इंडीया कंपनीचे 1630 पासूनचे अभिलेख जतन करून ठेवण्यात आले आहेत. आज या अभिलेखांचे आयुष्य चारशे वर्षाच्या आसपास आहे. काळाच्या ओघात हे अभिलेख जिर्णशिर्ण होत चालले आहेत, अशा दस्तावेजांची दुरूस्ती कशा प्रकारे केली जाते त्यासाठी कोणते साहित्य लागते याची माहिती आपण आजच्या लेखातून करून घेऊ या.
सर्व प्रथम कागद व त्यावरील वापरलेली शाई यांचा विचार करून दुरूस्ती प्रक्रिया सुरू करावी लागते. अभिलेखावरील फाटलेल्या भागात शाई स्पष्टपणे दिसते अस्फुट याचाही विचार करावा लागतो. त्या अक्षरावर कोणतीही गिरवणे किंवा कसलेही ते अक्षर पुर्नलेखन करण्याचा प्रयत्न करू नये.

अलिकडे आधुनिक पध्दतीने जीर्ण झालेले कागद दुरूस्त करण्याच्या प्रक्रियेस लॅमिनेशन करणे असे म्हणतात.
हा लॅमिनेशन पेपर राष्ट्रीय अभिलेखागारा मार्फत प्रत्येक राज्यांच्या गरजेनुसार एकत्रित आर्डर करून अमेरिकेतून मागविला जातो. प्रथम या टिश्यू पेपरच्या आत सँडविच सारखे अभिलेख ठेवून त्यावर सेल्युलोज असीटोन द्रवाचा बोळा फिरवल्यावर कागद एकजीव होतो आणि अभिलेखाचे आयुष्य शंभर वर्षाने वाढते. काही अभिलेख, दुर्मीळ छायाचित्रे हे मशीनवर लॅमिनेशन करण्यात येते.
काही अभिलेख हे डायरीच्या आकारात मोठ्या साईज मधील असतात त्यांच्या दुरूस्तीसाठी काश्मिरहून श्रीनगरच्या फॅक्टरीमध्ये तयार केलेला मखमली सिफाॅन कापड खरेदी करून तो या अभिलेखांच्या दुरूस्तीसाठी वापरण्यात येतो. त्यासाठी एक खास प्रकारची पेस्ट वापरली जाते. दोन्ही प्रकारे दुरूस्त केलेल्या कागदांची पुन्हा बाईंडिंग करून त्या डायरी किंवा फाईली योग्य ती माहिती लिहून स्टॅकएरियात पाठविली जाते हे काम मुख्य बाईंडरच्या देखरेखीत काळजीपूर्वक होत असते.
आता अभिलेखांचे सूक्ष्मचित्रीकरण करण्याची पद्धती सुरू झाली आहे त्यामध्ये रोल मायक्रोफिल्मींग, युनिटपर्यंत स्ट्रिप मायक्रोफिल्म , मायक्रोफिश, मायक्रोओपेक्स असे विविध प्रकार आहेत. आता डिजीटल पध्दतीनुसारही हे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मुंबई पुराभिलेखागारात आता सुसज्ज अद्ययावत यंत्रणा कार्यरत असून अभिलेखांच्या संरक्षणविषयक सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत असते.
डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन. मोबाईल 835 595 7451.










