
माजी नगरसेविका माधुरी प्रशांत काळे यांनी भावाचा जिव वाचविण्यासाठी दिला स्वःताच्या काळजाचा तुकडा !
कल्याण – भावाची लिव्हर्स अर्थात दोन्ही यकृते निकामी झाल्याने मृत्युच्या दारापर्यंत पोहचलेल्या भावाला स्वःताच्या काळजाचा तुकडा दान करून भावाचे प्राण वाचवणाऱ्या कल्याण पूर्वेतील बहीणीचे संपूर्ण ठाणे जिल्हयात कौतुक होत आहे .
विजयनगर प्रभागाच्या माजी नगरसेविका सौ . माधुरी प्रशांत काळे यांचा महाराष्ट्र पोलिसात असलेल्या आणि ऑल राऊंडर अष्टपैलु म्हणून ख्याती मिळवलेल्या ४५ वर्षीही अभिजित रमेशचंद्र भाबल या भावाचे दोन्ही लिव्हर्स निकामी झाल्याने तो मृत्युच्या दारापर्यंत पोहचला होता . लिव्हर टान्सफर शस्त्रक्रिया केल्या शिवाय त्याचे जगणे मुश्किल झाले होते, या गंभीर समस्येतून भावाला वाचविणासाठी माजी नगरसेविका सौ . माधुरी प्रशांत काळे या धावून गेल्या व रक्ताचे नाते असल्याने त्यांनी आपल्या लिव्हर पैकी सुमारे ६० टक्के लिव्हर दान करून ते भावाच्या शरिरात प्रत्यारोपित केले
या दरम्यान त्यांना अनेक वैद्यकीय तपासण्यांनाही सामोरे जावे लागले परंतु कसल्याही परिस्थितीत भावाचा प्राण वाचावेत या ध्येया पोटी त्या सर्व चाचण्यांना सामोरे गेल्या.
२ डिसेंबर २०२३ रोजी मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालगत तब्बल १२ तास ही यकृत प्रत्यापरोपणाची शस्त्रक्रीया पार पडली आणि यशस्वी झाली असून सद्या हे दोन्ही बहीण भाऊ सुखरूप आहेत .
वडीलोपार्जित संपत्तीत हिस्सा न मिळाल्यामुळे भावांच्या संपत्तीवर कायदेशीर मार्गाने वरवंटा फिरविण्यास सांगणार्या आजच्या आधुनिक बहीणींच्या युगात सौ . माधुरी प्रशांत काळे यांनी आपल्या भावाप्रती दाखवलेल्या या योगदाना बद्दल त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे .
(आनंद गायकवाड )










