जम्मू काश्मीरमध्ये 144 कलम लागू; राजकीय घडामोडींना वेग.

जम्मू काश्मीर: काश्मीरमधील अमरनाथचे यात्रेकरू आणि इतर पर्यटकांना परत पाठवल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आज मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं असून प्रमुख राजकीय नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. तसंच राज्यातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे.

काश्मीरमधील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर संस्थांना सोमवारपासून सुट्टी देण्यात आली आहे. श्रीनगरमधील सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीनगर शहर व जिल्ह्यामध्ये जमावबंदीही लागू करण्यात आली आहे. काश्मीरमधील राजकीय नेत्यांना स्थानबद्ध  करण्यात आले असून काँग्रेसने जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

अमित शहा यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले असून पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडाळाच्या बैठकीला सुरुवात लवकरच होवून, काश्मीरप्रश्नी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.