
मुलुंड (प्रतिनिधी):
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कामादरम्यान आज दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. मुलुंड परिसरात मेट्रो वाहिनीचे काम सुरू असताना अचानक स्लॅब कोसळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत काही मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम भागात मेट्रोचे पिलर आणि गर्डर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. आज काम सुरू असताना अचानक स्लॅबचा एक मोठा भाग खाली कोसळला. या आवाजाने परिसरातील नागरिक भयभीत झाले. या दुर्घटनेच्या वेळी घटनास्थळी अनेक मजूर कार्यरत होते.
बचावकार्य आणि मदत
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि महानगरपालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यात आली आहे.
प्रशासनाची भूमिका
मेट्र कामाच्या सुरक्षेबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली की सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे, याचा तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मेट्रो प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
बातमी, जाहिरातींसाठी संपर्क: 9920480613
युवा प्रगती






