सिंधुदुर्गात ग्रामस्थांनी घेतला पुढाकार, ग्रामपंचायतीची उदासीनता

ग्रामस्थांनी घेतला पुढाकार, कोसळलेल्या पुलाची डागडुजी

सिंधुदुर्ग: अतिवृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र वाताहत झालेली असून काल नेतर्डे, खोलबाग वाडीतील रस्त्याच्या पुलाचा भाग कोसळयामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकात भीतिचे वातावरण निर्माण झाले होते. एवढे आस्ताना येथील ग्रामपंचायत आणि प्रशासनाने या कड़े दुर्लक्ष केले. या पुलाची डागदूजी न केल्यास सम्पूर्णतः हा पुल आणि रस्ता वाहून जाण्याची भीति निर्माण झाली होती. दुपारपर्यंत वाट बघून शेवटी येथील युवकानी स्वतःच या पुलाची डागदूजी करण्याचे ठरवले आणि धो धो पावसात युवकानी एकत्र येऊन पुलाचा कोसळणारा भाग दुरुस्त करुन ग्रामस्थाच्या “एकीचे बळ” ही म्हण खरी करून दाखवली आहे.

ग्रामस्थ पुलाची डागडुजी करताना

या कामात दयानंद कुबल, सूरज कुबल, विकास कुबल,सागर कुबल,सुनील कुबल,महेंद्र कुबल, रामदास कुबल, सचिन कुबल, प्रमोद कुबल आदिनी हातभार लावला.