
नवी दिल्ली: पुढील आठवड्यात दहशतवादी भारतात हल्ला करण्याची शक्यता असल्याने तपास यंत्रणा तसेच सुरक्षा यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. १२ ऑगस्ट तसेच १५ ऑगस्ट या दोन दिवशी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. गुप्तचर यंत्रणाच्या इशाऱ्यानंतर देशातील १५ मोठ्या शहरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. काश्मीर, पूर्वोत्तर भारतातील शहरे हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. या ठिकाणी दहशतवादी मोठा हल्ला करण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्याने काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणेने देशात हाय अलर्ट बाबत माहिती सरकारला दिली आहे.






