सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, डॉक्टर आणि केमिस्ट मालक यांना पूरग्रस्तांना औषधी स्वरूपात मदतीची हाक

पूरग्रस्तांना औषधांच्या स्वरूपात मदत करा – प्रगती फौंडेशन

मुंबई : तुम्हां सगळ्यांना ठाऊक आहेच की, पश्चिम महाराष्ट्रात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले. या कठीण प्रसंगी प्रत्येक जण आपापल्या परीने जमेल तशी मदत करत आहेत. शासन स्तरावर आणि काही सामाजिक संस्थाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. अनेकज अन्न धान्य, कपडे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु आमच्या असे निदर्शनास आले आहे की पूरस्थिती नंतर आरोग्य विषयी समस्या निर्माण होणार आहे. यासाठी आरोग्य शिबिराबरोबर औषधे आवश्यक आहेत.
प्रगती फौंडेशन ही सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेली नामवंत संस्था आहे. संस्थेमार्फत पश्चिम महाराष्ट्रात खासकरून कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यात विविध दानशूर व्यक्ती आणि संस्थेमार्फत औषधे पुरविण्याचे कार्य हाती घेतले आहे. तरी समस्त नागरिकांना खासकरून डॉक्टर आणि केमिस्ट यांना आवाहन करण्यात येत आहे की जर का तुम्हाला औषधे पूरग्रस्तांना पाठवायची असेल तर कृपया आमच्या कार्यालयात संपर्क साधावा. शक्य असल्यास तुमच्या ठिकाणाहून औषधे स्वीकारले जातील तसेच त्याबाबत पोच पावतीही दिली जाईल.
कळावे,
प्रगती फौंडेशन मुंबई (रजि)
संपर्क: (022) 27723122
भ्रमण ध्वनी: 9920480613
इमेल: pragateefoundation@gmail.com
किंवा
info@pragateefoundation.org
वेबसाईट: www.pragateefoundation.org
पूरग्रस्तांना सर्वोपतारी मदत करावी. . .
कृपया हा संदेश तुमच्या ओळखीच्या दानशूर व्यक्तींना किंवा संस्थेला पुुढे पाठवावा.