युती होणार पण . . . चंद्रकांत पाटील

नागपूर : प्रेस क्लब’मध्ये आयोजित पत्रपरिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘दोन्ही पक्षांना युती हवी आणि त्यांना त्याची गरजही आहे. त्यामुळे युती होणार की नाही, हा मुद्दाच नाही. शंभर नाही तर तीनशे टक्के सांगतो की, युती होणारच. फक्त जागा वाटपाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. गेल्या निवडणुकांचा निकाल लक्षात घेता भाजपचे १२२ आमदार, अपक्षांचे समर्थन आणि इतर पक्षांमधून आलेले आमदार यांचा विचार करता आज भाजपचे संख्याबळ हे १३२ आमदारांचे आहे. त्यामुळे १३५ जागांवर समाधान मानणे भाजपसाठी अशक्य आहे. मुख्य म्हणजे याची जाणीव शिवसेनेलासुद्धा आहे. त्यामुळे जुना फॉर्म्युला यंदा शक्य नाही. आता नेमक्या कोणत्या जागा कुणाला जाणार, ही प्रक्रिया फार किचकट असते. ती चर्चेदरम्यानच सुटू शकते.’ जिंकलेल्या जागा सोडणार नाही!

भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये उभय पक्षांच्या गेल्या निवडणुकीत जिंकलेल्या जागा कायम राहतील. ज्याठिकाणी मित्र पक्षाचा आमदार निवडून आला आहे, त्या जागेवर दावा करायचा नाही, असे ठरले असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी युतीमधील जागावाटपाचे गणित बदलणार आणि त्यावर भाजपचा वरचष्मा असेल, असे स्पष्ट संकेत शनिवारी येथे दिले.