सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोन मधेच

सिंधुदुर्ग वासीयांच्या आनंदावर पडले विरजण

सिंधुदुर्गनगरी/प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्यात सापडलेला पहिला रुग्ण कोरोना मुक्त झाला असला तरी पुन्हा दुसरा कोरोना रुग्ण सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोन मध्ये गेलेला नसून ऑरेंज झोन मधेच राहिला आहे असे जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे,त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोन झोन मध्ये आल्याची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या यादीनंतर सिंधुदुर्ग वासीयांना झालेल्या आनंदावर विरजण पडले आहे.


सिंधुदुर्ग जिल्हात 25 मार्चला सापडलेला कोरोना बाधित रुग्ण बरा होऊन कोरोना मुक्त झाला त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोनच्या उंबरठ्यावर होता परुंतु जिल्ह्यात 29 एप्रिल रोजी एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता केंद्र शासनाने 30 एप्रिल रोजी यादी जाहीर केली आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग ग्रीन झोन मध्ये दाखवला आहे ही यादी जाहीर करण्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडलेल्या दुसऱ्या कोरोना रुग्णाची माहिती केंद्र शासनाला पोचली नव्हती त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रीनझोनच्या यादीत दाखविण्यात आला परंतु आपल्याकडे एक पॉझिटिव्ह रुग्ण असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा ऑरेंज झोन मधेच राहिला आहे याविषयी राज्य शासना मार्फत केंद्र शासनाला कळविण्यात आले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली .