
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षचे नेते नारायण राणेयांना अखेर भाजपप्रवेशाचा मुहूर्त सापडला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाआधी म्हणजे १ सप्टेंबर रोजी राणे त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपप्रवेशाच्या या वृत्ताला स्वत: राणेंनीच दुजोरा दिला आहे.
बेस्ट संयुक्त कृती समितीने सातवा वेतन आयोग लागू व्हावा म्हणून वडाळा डेपो येथे बेमुदत उपोषण पुकारले आहे. यावेळी कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती खालावल्याचं कळाल्यानंतर नारायण राणे यांनी उपोषककर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला दुजोरा दिला.






