पनवेलमध्ये ‘महास्वच्छता रॅली’

पनवेल:केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 11 सप्टेंबर, 2019 ते 27 ऑक्टोंबर, 2019  या कालावधीत  “स्वच्छता ही सेवा “ ही मोहिम राबविण्यात येत आहे. 

प्लास्टिक मुक्त पनवेल शहर व घनकचरा वर्गीकरण या वर भर देत नागरिकांनां आवाहन करण्यात येत आहे तद्अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेमार्फत इन्फिनिटी फौंडेशन आणि आय.टी.एम. कॉलेज, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानने व माननीय आयुक्त श्री गणेश देशमुख सर व माननीय अतिरिक्त आयुक्त डॉ प्रशांत रसाळ सर यांच्या अध्यक्षतेखाली जनजागृतीपर ” महास्वच्छतारॅली 2019“चे यशस्वी रित्या आयोजन करण्यात आले. 

सदर कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. मनोज भुजबळ, नगरसेविका श्रीम. राजश्री विवेकर, सहायक आयुक्त श्री. शाम पोशेट्टी, मुख्यलेखाधिकारी श्री. मनोजकुमार शेट्टे, स्वच्छ भारत अभियान वरिष्ठ सल्लागार श्रीम मधुप्रिया आवटे, प्रभाग अधिकारी श्री. श्रीराम हजारे आरोग्य निरीक्षक श्री शैलेश गायकवाड , कनिष्ठ सल्लागार सदाकत अली व इतर महानगरपालिका अधिकारी तसेच  प्रोफ. आर.एस.मणी ( उपाध्यक्ष  ITM GROUP), डॉ. समीर  पाचपुते  (डायरेक्टर, ITM College), श्री. किरण  राणे  (रजिस्टार, ITM College) ह्यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात सुमारे 1000 हुन अधिक  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नागरीकांना स्वच्छतेचा तसेच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीक मुक्त पनवेल शहर आला जनजागृतीपर संदेश देण्यात आले. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांमार्फत स्वछतेची शपथ घेण्यात आली.  मान्यवरांच्या भाषणाने व मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.