. . . तर युती तुटेल ?

मुंबई: तिकडे आघाडीचं जुळलं असताना इकडे महायुतीचा तिढा काही सुटेना. त्यात दररोज भाजपा किंवा शिवसेनेचा एखादा नेता काहीतरी वक्तव्य करून युतीच्या संभ्रमात अधिकच भर टाकत आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला १४४ जागा दिल्या नाहीत तर, युती तुटू शकते, असं विधान करून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांनी खळबळ उडवून दिली. रावते यांच्या या भूमिकेचं पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. रावते काहीच चुकीचे बोलले नाहीत, असे ते म्हणाले. शिवसेना नेत्यांच्या या भूमिकेमुळं युतीच्या जागावाटपाचा तिढा आणखी वाढला आहे.