
डोंबिवली: लोकसभा निवडणूक 2019 च्या कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक शांततेत पार पाडावी याकरिता सी आर पी एफ चे एक अधिकारी व नव्वद कर्मचारी मानपाडा पोलिस ठाण्याला देण्यात आले होते. या सर्व कर्मचारी वर्गाची राहण्याची सोय मानपाडा पोलिस स्टेशनला शक्य नसल्याने त्यांची राहण्याची सोय कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने त्यांच्या गार्डीयन हायस्कूल नवनीत नगर, देसलेपाडा, डोंबिवली येथे करण्यात आली होती. या अनुषंगाने ट्रस्टने केलेल्या सहकार्याबद्दल कस्तुरी ट्रस्टचे सदस्य श्री एम. के वर्गीस यांचा मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा हरी चौरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्री. वर्गीस यांना त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. भविष्यातही अशीच सहकार्य करण्याविषयी भावना व्यक्त करण्यात आली.






