येवले चहावर कारवाई

पुणे: अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मार्फत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या’येवले चहा’ वर कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे अचानक तपासणी केली. त्यावेळी चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन एफडीएने जप्त केला आहे.

कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पँकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन ‘येवले चहा’ने केले असल्याची बाब एफडीएच्या निदर्शनास आली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचा एफडीएने दिला आहे. तुर्तास शहरात असणारे विविध चहा केंद्र हे साठा असेपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती समजते.