मुंबई – पुणे महामार्ग उद्या दोन तासांसाठी बंद

पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शेंडूग फाटा अगोदर कमानी बोर्ड बसविण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून पुण्याकडे जाणारी वाहतूक दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून कळंबोली सर्कल-उरण बायपास रोड- टी पॉइंट- पळस्पे फाटा-कोनगाव-कोन पूल- शेडूंग- चौकफाटा- खालपूर व पुन्हा एक्सप्रेस वे असा पर्यायी मार्ग प्रवाशांना देण्यात आला आहे. तसेच कळंबोली सर्कल – खांदा कॉलनी सिग्नल – पनवेल ओहर ब्रीज – तक्का गाव ( पंचमुखी हनुमान मंदिर ) – पळस्पे फाटा – कोन गाव (एन.एच.०४ मार्गे) – कोन ब्रीज – शेंडुंग – चौकफाटा – खालापूर व परत एक्सप्रेस वे असा ही दुसरा पर्यायी मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रवाशांनी या दोन्ही पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचं आवाहन महामार्ग पोलीस निरीक्षक सुदाम पाचोरकर यांनी केलं आहे.