विधानसभा निवडणुकीत भाजपा -शिवसेना युती पक्की चंद्रकांत पाटील

आदित्य ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्री बाबत माहिती नाही, भाजपात मेगा भरती सुरूच

मुंबई: महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना यांची युती पक्की आहे. शंभर टक्के युती होणार असून याबाबत अधिकृत घोषणा लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आजही भाजपात इन कमिंग सुरूच होते आणि आज त्यात गोपीचंद पडळकर, नमिता मुंदडा यांची भर पडली.

नमिता या राज्याच्या मंत्री दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. डॉ. मुंदडा यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्या दोनदा भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा त्यांनी विधानसभेत प्रवेश केला होता. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही भूषवले होते.