अ‍ॅमेझॉन भारतात 1,10,000 लोकांना नोकरी देण्याच्या तयारीत

 नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली बातमी आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon) सणासुदीच्या हंगामापूर्वी भारतात नोकऱ्यांचा पेटारा उघडला आहे. अ‍ॅमेझॉन भारतात 1,10,000 लोकांना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात भरती केली जाणार आहे.

अ‍ॅमेझॉनने सणासुदीच्या हंगामापूर्वी आपल्या ऑपरेशन नेटवर्कमध्ये 1,10,000 हून अधिक हंगामी नोकऱ्यांच्या संधी निर्माण केल्या आहेत. यात मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.

 नवीन नोकऱ्या 8,000 नोकऱ्यांव्यतिरिक्त आहेत, ज्याची घोषणा नुकतीच अ‍ॅमेझॉनने केली होती. कंपनीने अलीकडेच म्हटले होते की ते यावर्षी 8,000 पदे भरणार आहेत. या 8,000 नोकऱ्यांव्यतिरिक्त 2025 पर्यंत देशभरात 10 लाख नवीन नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्या तयारी असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे. यापैकी बहुतेक नवीन कर्मचारी अ‍ॅमेझॉन नेटवर्कमध्ये सामील झाले आहेत आणि ग्राहकांना ऑर्डर, पॅक, कुरिअर करणे यासारख्या कामात मदत करतील. नवीन अपॉइंटमेंटमध्ये काही व्हर्च्युअल ग्राहक सेवा मॉडेल आहे, ज्या घरून कामाची सुविधा मिळते.