
मुंबई: काही तासांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीबाबत संयुक्तपणे सांगतील. मला काहीही अधिकार नाहीत. त्यामुळे युतीबाबत काहीही सांगू शकत नाही, असे म्हटले होते. त्यानंतर पाटील यांच्याच सहीचं पत्रं व्हायरल झाले.
शिवसेना-भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीची अखेर संयुक्त पत्रकाद्वारे घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइं नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा निर्णय घेण्यात आला असून तशी घोषणा करण्यात येत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. महायुतीतील कोणता पक्ष किती जागा व कोणत्या जागा लढवणार याचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे चार दिवस बाकी असतानाही महायुतीच्या जागांचा तपशील लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलं आहे.
विशेष म्हणजे महायुतीच्या पत्रकावर केवळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याच सह्या आहेत.







