नवी मुंबई महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत जाहीर आवाहन

नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत दिनांक 03 ऑक्टोबर 2019 रोजी मुख्य जलवाहिनी व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथील पावसाळा नंतरची देखभाल दुरुस्तीची काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीवरील पाणी पुरवठा गुरुवारी दि.03 ऑक्टोबर 2019 रोजी बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली या विभागात दिनांक 03 ऑक्टोबर 2019 रोजी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळ जोडण्यांचा व सिडको क्षेत्रातील कामोठे  नोड मधील पाणी पुरवठा देखील बंद राहील. तसेच मंगळवार दिनांक 04 ऑक्टोबर 2019 रोजी कमी वेळ व कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.
 याव्दारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांना आवाहन करण्यात येते कि, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करुन नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे.