मनसेची दुसरी यादी जाहीर; वरळीत आदित्यला ‘मनसे’ पाठिंबा?

मुंबई: राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज अधिकृतपणे दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४५ नावांचा समावेश आहे. याआधी पहिली यादी जाहीर करताना मनसेने २७ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. पहिली व दुसरी यादी मिळून मनसेने आतापर्यंत ७२ जणांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मनसेने ७२ जणांना उमेदवारी जाहीर केली असली तरी मनसेने अद्याप वरळी मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. 

मनसेने आज जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील मतदारसंघाचा समावेश आहे. परंतु, वरळी मतदारसंघातून मनसेने अद्याप कोणालाही मैदानात उतरवण्यात आलेले नाही. त्यामुळे काका राज ठाकरे यांचा पुतण्या आदित्य ठाकरे याला’मनसे’ पाठिंबा मिळणार असे वाटते.